“भाजप हा,वापरा आणि फेकून द्या !” -जयवंतराव पाटील असा पक्ष
पक्षाने डावलल्याने जयवंत पाटील यांचा लोकशाही आघाडीतुन अर्ज

कराड / प्रतिनिधी : –
कराड शहराच्या राजकारणात मोठा भूकंप घडवत माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी भाजपवर थेट निशाणा साधला आहे. “गेली पंधरा वर्षे डॉ. अतुल भोसले यांच्यासोबत निष्ठेने काम केले, परंतु भाजपा हा वापरा आणि फेकून द्या असा पक्ष आहे. भाजपने संधी असूनही मला जाणीवपूर्वक डावलले,” असा खळबळजनक आरोप करत त्यांनी पक्षाविरोधात मोठे पडसाद उमटवले.
भाजपने सतत मागे ढकलल्यानंतर आज जयवंत पाटील यांनी लोकशाही आघाडीतून आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरीत्या दाखल केला. अर्ज दाखल करतानाच त्यांनी भाजपवर जोरदार टीका करत पक्ष नेतृत्वावर विश्वासघाताचा ठपका ठेवला.
ते पुढे म्हणाले की, “गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवारांना कराड शहरातून मी मनापासून, मेहनत घेऊन भरभरून मते मिळवून दिली. पण आज संधी आली तेव्हा मला सोयीस्करपणे बाजूला सारण्यात आले. हा भाजपचा खरा चेहरा आहे.”
पाटील यांनी भाजपवर हल्ला चढवत सांगितले की, विकासासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपमान हा पक्षाचा स्वभाव बनला आहे. त्यामुळेच लोकशाही आघाडीतून निवडणूक लढवत असून कराडवासीयांचा निर्णय हा अंतिम असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पाटील यांच्या या विधानामुळे कराडच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून आगामी निवडणुकीत या घडामोडींचा मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



