आयुष्यमान स्पेशलमहाराष्ट्रहोम

कराडच्या रणांगणात शेवटच्या दिवशी ‘किरण पाटील’ यांची दमदार एन्ट्री!

प्रभाग क्रमांक १३ मधून उमेदवारी अर्ज दाखल

 

कराड / प्रतिनिधी : –

कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १३ मधून होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सोमवार दिनांक १७ रोजी किरण विश्वनाथ पाटील यांनी सर्वसाधारण प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज शिवसेना पक्षातून व यशवंत विकास आघाडीतून उमेदवारी कडून दाखल केला आहे.

त्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या समक्ष आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केला. अर्ज दाखल करण्याच्या या हालचालीमुळे कराडमधील राजकीय वातावरणात चांगलीच लक्षवेधी चर्चा सुरू झाली आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १७ नोव्हेंबर आज हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.  ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्यास वेळ दिली आहे.

 

या निवडणुकीत २ डिसेंबर रोजी मतदान होईल, तर ३ डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांतून उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू असून कराडमधील निवडणुकीची तापमानपातळी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे

Related Articles