आयुष्यमान स्पेशलमहाराष्ट्रसातारा जिल्हाहोम

कराडमध्ये निवडणूक रंगतदार; अतुल शिंदेंनी भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल

कराड / प्रतिनिधी :

कराड नगरपरिषदेसाठी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया वेग घेत असताना आज रविवार, १६ नोव्हेंबर रोजी भाजपकडून अतुल शिंदे यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

अतुल शिंदे यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या समक्ष आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केला.  कराडमधील राजकीय वातावरणात चांगलीच लक्षवेधी चर्चा सुरू झाली आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १७ नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. आयोगाने उमेदवारी अर्जासाठी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत ऑनलाईन, तर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्यास वेळ दिली आहे.

या निवडणुकीत २ डिसेंबर रोजी मतदान होईल, तर ३ डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांतून उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू असून कराडमधील निवडणुकीची तापमानपातळी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

 

अतुल शिंदे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केल्याने भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या शर्यतीला आता वेग आला असून इतर संभाव्य उमेदवार कोण असणार याकडे कराडवासीयांचे लक्ष लागले आहे.

अतुल शिंदे यावेळी बोलताना म्हणाले भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार अध्यक्षपदाचा अर्ज भरला असून आमचे नेते विद्यमान आमदार अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवेन बरेच दिवस कराडमध्ये माझ्या नावाची चर्चा असून भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणूनच मी या रणांगणात असेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

Related Articles