गोसावेवाडी ग्रामस्थांचा भाजपमध्ये प्रवेश

कराड/प्रतिनिधी : –
गोसावेवाडी, ता. कराड येथील ग्रामस्थांनी कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. उपसरपंच संतोष शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी आमदार घोरपडे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हातात घेत पक्षविस्ताराला बळ दिले.
यावेळी बोलताना उपसरपंच धनाजी शिंदे म्हणाले, आमदार मनोज घोरपडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली हणबरवाडी – धनगरवाडी योजना मार्गी लावून विकासाला वेग दिला आहे. त्यांच्या काम करण्याच्या तळमळीमुळे आणि सततच्या जनसंपर्कामुळे मतदारसंघातील नागरिक समाधानी आहेत. ग्रामस्थांनी एकत्रितपणे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला असून, केंद्र व राज्यातील भाजप सरकारमुळे विकासाची गती अधिक वाढली आहे. या सर्वांच्या परिणामी आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला.
कार्यक्रमाला धनाजी जाधव, लालासो शिंदे, हणमंत जाधव, विजय गोसावी, सुखदेव गोसावी, सुरेश जाधव, पंकज जगदाळे, सपंत जगदाळे, दादासो जाधव, अजित जाधव, सुमित शिंदे, अक्षय शिंदे, कृष्णा शिंदे, राजू मोहिते, विनोद शिंदे, सागर शिंदे, सुरज शिंदे, लक्ष्मण जाधव, आप्पा जाधव, पोपट जाधव, सभाजी मदने, आनंदा संकपाळ, तानाजी बनसोडे, आबा गोसावी, तानाजी गोसावी, संतोष मदने, मारुती मदने, उत्तम शिंदे, विलास शिंदे, अनिल शिंदे, सुनील शिंदे, सूरज संभाजी शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.



