रामकृष्ण वेताळ संचालन समिती राज्य संपर्क समन्वयकपदी

कराड/प्रतिनिधी : –
ओगलेवाडी: आगामी नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद,पंचायत समिती व महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रदेश संचालन समितीची स्थापना करण्यात आली आहे.या समितीच्या अध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आहेत.तर कृषी क्षेत्र संपर्क समन्वयक पदी रामकृष्ण वेताळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यामुळे रामकृष्ण वेताळ यांची राज्यपातळीवर नवी इनिंग सुरू होणार आहे.
राज्यभरात होणाऱ्या आगामी सर्व निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवार निश्चिती व निवडणूक रणनीती तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रदेश संचालन समिती स्थापन करण्यात आली आहे. निवडणुकीच्या रणनीतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे अधिकार या समितीकडे असणार आहेत. या समितीमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री ना.प्रवीण दरेकर,आ. श्रीकांत भारतीय,माधवी नाईक,आ. विक्रांत पाटील,माधव भंडारी,केशव उपाध्ये, नवनाथ बन,आ. चित्रा वाघ,आ. प्रसाद लाड,आ.योगेश सागर यांचा समावेश आहे.अशा या महत्त्वपूर्ण समितीमध्ये रामकृष्ण वेताळ यांची पक्षाने निवड केली असल्याने पक्षीय पातळीवरील त्यांचे महत्त्व अधोरेखित होत आहे. कराड उत्तर मतदार संघातील त्यांचे संघटन कौशल्य पाहून ही निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे वरील माहिती दिली आहे.
या निवडीबद्दल रामकृष्ण वेताळ यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुल भोसले,आ. मनोज घोरपडे,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर,भाजपा सातारा जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशील कदम आदी मान्यवरांनी अभिनंदन केले. या निवडीमुळे रामकृष्ण वेताळ यांची राज्यपातळीवरील नवीन इनिंग सुरू होणार आहे.
पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पडणार
भारतीय जनता पार्टीने प्रदेश संचालन समितीच्या कृषी क्षेत्र संपर्क समन्वयक पदी नियुक्ती केल्याने जबाबदारी वाढली आहे. या पुढील काळात पक्षाने दिलेले काम योग्य प्रकारे पार पाडून सर्व निवडणुकीमध्ये पक्ष यशस्वी होण्यासाठी योग्य नियोजन व कार्यवाही करणार आहे.भाजपाच्या सर्वाधिक जागा निवडून येण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली जाईल, असे मत रामकृष्ण वेताळ यांनी व्यक्त केले.



