स्व. यशवंतराव मोहिते यांचे विचार तरुण पिढीला मार्गदर्शक – डॉ. सुरेश भोसले
कराड/प्रतिनिधी : –
स्व. यशवंतराव मोहिते भाऊ हे द्रष्टे नेते होते. त्यांनी सहकारमंत्री म्हणून असंख्य समाजाभिमुख निर्णय राबविले. त्यांचे विचार तरुण पिढीला मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर थोर विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते (भाऊ) यांना १०५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. दरम्यान आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासह मान्यवरांनीही अभिवादन केले.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, थोर विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते भाऊ यांचे सहकार चळवळीत मोलाचे योगदान राहिले. त्यांनी शेतकरी वर्गाला सोप्या भाषेत शेतीचे अर्थकारण शिकवले.
यावेळी कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, जे.डी.मोरे, जितेंद्र पाटील, वसंतराव शिंदे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, एम. के. कापूरकर, बाळासाहेब पाटील, पैलवान आनंदराव मोहिते, कृष्णा बँकेचे माजी संचालक हिंदुराव थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
थोर विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते भाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. उपस्थित मान्यवरांनी स्व. यशवंतराव मोहिते भाऊंच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



