खा. उदयनराजे भोसले यांची आनंदराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट

जुन्या आठवणींना दिला उजाळा; गोरगरिबांसाठी नानांचे कार्य प्रेरणादायी – उदयनराजे
कराड/प्रतिनिधी : –
दिवाळी फराळाच्या निमित्ताने सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी माजी आमदार आनंदराव (नाना) पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान उदयनराजे आणि नानांनी जुन्या आठवणींना उजाळा देत, जिल्ह्याच्या राजकारण आणि समाजकारणातील विविध प्रसंगांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या.
याप्रसंगी बोलताना उदयनराजे म्हणाले, सातारा जिल्ह्याच्या राजकारणात व समाजकारणात आनंदराव नानांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी आयुष्यभर गोरगरिबांच्या आणि वंचितांच्या न्यायासाठी संघर्ष केला. सर्वसमावेशक नेतृत्व व संघटन कौशल्य असणारे नेते म्हणून नानांचे नाव आजही आदराने घेतले जाते.
दरम्यान, उदयनराजेंनी नानांच्या आत्मीय स्वागतानंतर दिवाळी फराळाचा आनंद घेतला. परिसरातील असंख्य कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत ही सदिच्छा भेट उत्साहात पार पडली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, माजी नगरसेवक हणमंतराव पवार, मनसे शहराध्यक्ष सागर बर्गे, अॅड.ए.वाय. पाटील, महेश पाटील, उपसरपंच मानसिंग पाटील, युवा नेते प्रताप पाटील, मधू जाधव, विक्रांत साळी, पै. महेश भोसले, गिरीश पाटील, आशिष माने, महादेव पवार, पै. नयन निकम, अभिजित पवार, अर्जुन हुबाले यांसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
				


