सातारा जिल्हाहोम

कराड अर्बन बँकेतर्फे चारचाकी वाहनांचे वितरण 

कराड प्रतिनिधी : –

पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक म्हणून ओळख असलेल्या दि कराड अर्बन को-ऑप. बँक लि. या बँकेच्या वतीने ग्राहकांसाठी आकर्षक वाहनकर्ज योजना राबविण्यात येत आहे. घरगुती वापरासाठी चारचाकी वाहन खरेदीसाठी ८.५० टक्के आणि दुचाकीसाठी केवळ ८ टक्के व्याजदर बँकेने जाहीर केला असून, या योजनेमुळे ग्राहकांचे वाहन खरेदीचे स्वप्न पूर्णत्वास जात आहे.

बँकेच्या विविध शाखांच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळालेल्या चारचाकी वाहनांचे वितरण बँकेच्या मुख्य कार्यालयात शुक्रवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, अध्यक्ष समीर जोशी, उपाध्यक्ष शशांक पालकर, व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुभाषराव जोशी म्हणाले, कराड अर्बन बँकेने सदैव ग्राहकांच्या गरजांना प्राधान्य देत माफक व्याजदरात विविध कर्ज योजना राबवल्या आहेत. कराड परिसरात नव्या प्रकारच्या गाड्यांची मागणी वाढत असून, त्यामध्ये अर्बन बँकेचा वाटा सर्वाधिक आहे. बहुतांश गाड्या या अर्बन बँकेकडून कर्ज घेतलेल्या ग्राहकांच्या आहेत, हे आमच्यासाठी अभिमानाचे आहे.

ग्राहकांना कमी वेळेत जलद आणि सुलभ सेवा मिळावी यासाठी बँकेने वाहनकर्जासाठी स्वतंत्र विभाग कार्यान्वित केल्याचेही त्यांनी सांगितले. या विभागामुळे नागरिकांना तत्पर सेवा मिळेल. सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. जोशी यांनी केले.

Related Articles