सातारा जिल्हाहोम

नारायणवाडी ग्रामपंचायतीचा प्रेरणादायी उपक्रम 

लखपती दिदी अभियानासह स्वच्छ, समृद्ध आणि आदर्श गावाकडे वाटचाल

कराड/प्रतिनिधी : – 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत नारायणवाडी (ता. कराड) ग्रामपंचायतीत “लखपती दिदी” या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रशंसनीय उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या निमित्ताने ग्रामपंचायतीत विशेष मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत माळी, पंचायत समिती कराड (उमेद) चे प्रभाग समन्वयक करण जाधव, तसेच रणरागिणी महिला ग्रामसंघ अध्यक्षा लता यादव उपस्थित होत्या. सभेत महिलांना बचत गटांचे महत्त्व, आर्थिक स्वावलंबनाचे मार्ग आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याची माहिती देण्यात आली.

गावातील महिलांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या गावाला आदर्श व समृद्ध बनविण्याचा निर्धार व्यक्त केला. सभेत सर्वानुमते यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान गावात 100 टक्के राबविण्याचा निर्धार, गाव प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प, 15 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के पाणीपट्टी वसुली करण्याचा निर्णय आदी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

नारायणवाडी ग्रामपंचायतीचा हा उपक्रम केवळ आर्थिक सबलीकरणापुरता मर्यादित न राहता स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि प्रशासनिक पारदर्शकतेकडे वाटचाल करणारा ठरत आहे.

Related Articles