कराड अर्बनच्या नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा माजी सेवकांकडून सत्कार

कराड/प्रतिनिधी : –
दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., कराड बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी व उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची निवड झाल्याबद्दल बँकेच्या मुख्य कार्यालयात माजी सेवकांनी बँकेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
याप्रसंगी बँकेचे संचालक, अधिकारी, तसेच ज्येष्ठ माजी सेवक डी.एच. कुलकर्णी, हेमंत देशपांडे, विश्वनाथ जोशी, माधव माने, प्रकाश सराफदार, चंद्रकांत जिरंगे, विलास चव्हाण, किशोर जाधव, नेताजी जमाले, मोहन वराडकर यांच्या ४० माजी सेवक उपस्थित होते.
अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी व माजी अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची आजपर्यंतची वाटचाल सुरु आहे. त्यांनी घालून दिलेल्या तत्वांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्व संचालक मंडळाच्या सहकार्यातून यापुढील वाटचाल करणार आहे. बँकेच्या सर्व शाखांमध्ये उत्तम ग्राहकसेवा, पारदर्शक कामकाज व समाजाभिमुख योजना राबविणार असल्याचा मनोदय अध्यक्ष समीर जोशी यांनी व्यक्त केला.
बँकेच्या प्रगतीत आजी-माजी सेवकांचे योगदान मोठे आहे. यापुढील काळात बँकेचा व्यवसाय आणि सामाजिक कार्याचा व्याप अधिक वाढविण्याचा निर्धार उपाध्यक्ष शशांक पालकर यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित माजी सेवकांनी बँकेविषयी मनोगत व्यक्त केले.