सातारा जिल्हाहोम

आय.डी.एफ.सी फर्स्ट बँकेच्या कराड शाखेचे उद्घाटन

कराड/प्रतिनिधी : – 

आय.डी.एफ.सी फर्स्ट बँकेच्या कराड शाखेचे उद्घाटन कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बँकेचे वरिष्ठ अधिकारी पुनीत मदन, दीपक खैरनार, विकास राठोड, अमित नलवडे व कर्मचारी आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या नव्या शाखेच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना अधिक सुलभ बँकिंग सुविधा मिळतील. तसेच लघु उद्योग, शेतकरी व सामान्य ग्राहक यांचे आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने करता येतील.नवीन शाखेच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना सुलभ बँकिंग सेवा, कर्ज सुविधा, बचत योजना आणि लघुउद्योग व शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक सहाय्य यासारख्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

ही शाखा सुरु करण्यामागे मुख्य उद्दिष्ट म्हणजे स्थानिक समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे, लघु उद्योगांना बळकटी देणे, शेतकरी व सामान्य ग्राहकांना अधिक सुरक्षित व सोप्या आर्थिक व्यवहाराची सुविधा पुरवणे हा मुख्य उद्देश आहे.

कराड भागात आय डी एफ सी फर्स्ट सारख्या मोठ्या बँकेची शाखा सुरू झाल्यामुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

Related Articles