सातारा जिल्हाहोम

कराड उत्तर मतदार संघासाठी 2.50 कोटींचा निधी – आमदार मनोज घोरपडे 

कराड/प्रतिनिधी : –

कराड उत्तर मतदार संघातील खटाव, कोरेगाव, सातारा व कराड तालुक्यातील विविध गावांमध्ये मंदिर सभामंडप, रस्ते काँक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉक, स्मशानभूमी रस्ता, गटर आदी विकासकामांसाठी राज्य शासनाच्या २५/१५ योजनेतून आमदार मनोज घोरपडे यांनी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे ग्रामीण भागातील धार्मिक व सामाजिक ठिकाणांच्या सुविधा अधिक विकसित होऊन ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.

खटाव तालुक्यातील पारगाव महादेव मंदिर सभामंडप, चोराडे येथील नंदीवाले समाज सभामंडप, मुसांडवाडी जगतापवाडी येथील हनुमान मंदिराजवळपेव्हर ब्लॉक व वॉल कंम्पाउंड, वांझोळी येथील ज्योतिर्लिंग मंदिर येथे सभा मंडप, म्हासुर्णे येथील खडीचा माळ येथे जानुबाई मंदिर सभामंडपासाठी प्रत्येकी दहा लाख निधी मंजूर झाला आहे. कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी येथील म्हातोबा मंदिर परिसर सुशोभिकरण व पेव्हर्स बसविणे, जायगाव येथे उर्वरित सभामंडपाचे काम करणे, मुळीकवाडी येथे अंतर्गत कॉक्रिटिकरण करणे या प्रत्येक कामास दहा लाख, तर मोहितेवाडी येथे मुख्य चौकात खुले आर. सी.सी स्टेज व वरती स्लॅब बांधण्यासाठी २० लाख रूपये मंजूर करण्यात आला आहे. सातारा तालुक्यातील माजगाव येथील मारुती मंदिरासमोर सभागृह बांधणे, भैरवगड येथे अंतर्गत काँक्रिटिकरण करणे, आंबेवाडी येथे स्मशानभूमी रस्ता करणे, निनाम येथे गावामध्ये अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, काशीळ येथे राम मंदिर सभामंडप बांधणे, कामेरी येथे टेकावरती आर. सीसी, गटर व रस्ता काँक्रिटीकरण करणे, खोजेवाडी येथे स्मशानभूमी दुरुस्ती करणे. कराड तालुक्यातील मेरवेवाडी येथे सिद्धनाथ मंदिर सभामंडप बांधणे, रिसवड तायेथे येथील तुळजाभवानी मंदिराकडे जाणारा रस्ता पेव्हर ब्लॉक व मंदिरासमोर सभा मंडप बांधणे, वाघेश्वर येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे, घोलपवाडी येथे महादेव मंदिर सभामंडप बांधणे, किवळ येथे ज्ञानेश्वर मंदिरासमोर सभामंडप बांधणे, सावरघरयेथे मंदिरासमोरील पेव्हर ब्लॉक बसवणे व रस्ता काँक्रीटीकरण करणे, उंब्रज येथे रुक्मिणीनगर येथे सभामंडप बांधणे, शिवडे येथे हिराई गार्डन येथे रस्ता काँक्रीटीकरण व गटर करणे प्रत्येकी दहा लाख रूपये असा एकुण २४ गावातील विविध कामासाठी दोन कोटी ५० लाख रूपयांचे निधी मंजूर करण्यात आला आहे.

Related Articles