सातारा जिल्हाहोम
उपजिल्हा रुग्णालयात श्री महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी

कराड/प्रतिनिधी : –
येथील सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी श्री महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लाळे यांच्या हस्ते श्री महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सहाय्यक अधिसेविका श्रीमती मंगल जानकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती सदाकाळ, सर्जन संतोष शेटे, फार्मासिस्ट अमोल पोतदार, एक्स-रे तंत्रज्ञ गणेश चव्हाण, लिपिक कोळेकर, मनोज पाटील, सागर तोडकर, तसेच श्री महर्षी वाल्मिकी गणेश मंडळाचे पदाधिकारी व सदस्य विनय चव्हाण, शुभम चावरे, प्रवीण चव्हाण, कुणाल पडवळ उपस्थित होते. उपजिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक महेश शिंदे यांनी आभार मानले.