सातारा जिल्हाहोम

सर न्यायाधीशांवर बूट फेकण्याच्या हल्ल्याबद्दल किशोर राकेशचा इस्लामपुरात राष्ट्रवादीकडून निषेध

इस्लामपूर/प्रतिनिधी : – 

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर मनुवादी विचाराचा वकील किशोर राकेश याने केलेल्या बूट फेकण्याच्या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इस्लामपूर येथे जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी वाळवा तालुक्याचे तहसीलदार सचिन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील,तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील,माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे,महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधिश मा.भूषण गवई यांच्यावर न्यायालयात कामकाज चालू असताना मनुवादी विकृत मनोवृत्तीचा वकील किशोर राकेश याने बूट फेकण्याचा प्रयत्न केला आहे. हा हल्ला एका व्यक्तीवरचा नसून लोकशाही, न्याय व्यवस्था आणि संविधानावरचा हल्ला आहे. या जातीयवादी विचारांच्या लोकांची इतकी हिंमत होतेच कशी? या व्यक्तीचा आणि वृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो. किशोर राकेश याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत कठोर कारवाई व्हावी,अशी मागणी करीत आहोत,असे निवेदनात नमूद केले आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाषराव सुर्यवंशी, महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात,संदीप पाटील,माजी सभापती शैलेंद्र सुर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव चव्हाण, संचालक शैलेश पाटील,राजेंद्र पाटील,माजी नगरसेविका कोमल बनसोडे,मनिषा पेठकर, मालन वाकळे, सुप्रिया कांबळे, बाळासाहेब कोळेकर, युवक शहराध्यक्ष दिग्विजय पाटील, माजी अध्यक्ष सचिन कोळी, माजी कार्याध्यक्ष स्वरूप मोरे,सागर चव्हाण, सुभाष माने, शकील जमादार, रणजित गायकवाड, संजय पाटील, हौसराव पाटील, अभिमन्यू क्षिरसागर, विक्रम घाटगे, अभिजित पाटील, सचिन हांडे, मुबारक पठाण, सूरज कचरे, ऋषभ कोठारी यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles