संग्राम घोरपडेंचा वाढदिवस उत्साहात साजरा

कराड/प्रतिनिधी : –
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज घोरपडे व उद्योजक विक्रम घोरपडे यांचे बंधू, अटलांटा उद्योगसमूहाचे संस्थापक तसेच खटाव-माण साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक युवा नेते संग्राम घोरपडे यांचा वाढदिवस गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला.
मत्त्यापूर (ता. सातारा) येथे सकाळी वडील (कै.) भीमराव घोरपडे यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर आई मंगलताई घोरपडे आणि कुटुंबीयांनी पारंपरिक औक्षण केले. ग्रामदैवताचे दर्शन घेऊन खंडोबाची पाल येथील खंडेरायाला अभिषेक व लाडू तुला करण्यात आला.
सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसादिन विविध उपक्रम राबविण्यात आले. मसुर येथील जिल्हा परिषद शाळा, बी. के. इंग्लिश मिडियम स्कूल (पाल) आणि रणजीत कौर गडोख विद्यालय (अतित) येथे शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. तसेच भवानवाडी (चरेगाव) येथे नेत्रचिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिर, नागठाणे व खटाव-माण साखर कारखान्यावर रक्तदान शिबिर, निसराळे येथील साहस विशेष बालक वस्तीगृहात खाऊ वाटप, तसेच उंब्रज येथे बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात आली.
दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत मत्त्यापूर येथील निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी नेतेमंडळी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती व मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती.
या प्रसंगी माजी आमदार आनंदराव पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, सुरेश पाटील, महेश जाधव, वासुदेव माने, बाबासाहेब घोरपडे, यशवंत ढाणे, माधवराव गुरव, विजयाताई गुरव, बजरंग जाधव, संतोष पाटील, दिगंबर भिसे, जयवंत जाधव, मोहन माने, निवासराव निकम, नयन निकम, महेश चंदुगडे, रणजीत पाटील, जगन थोरात, वैभव चव्हाण, उमेश मोहिते, राजेंद्र मोहिते, शरद घोलप, दिनकर पाटील, जयवंतराव जगदाळे, संपतराव इंगवले, शुभम चव्हाण, अमोल पवार, कृष्णत शेलार, महेश चव्हाण, राहुल पाटील, तुकाराम नलावडे, राजन पाटील, विनोद डूबल, निलेश डूबल, संभाजी पिसाळ, श्रीकांत पिसाळ, सचिन पवार, विठ्ठल काकडे, सुधीर शेळके, प्रशांत कणसे, ॲड. धनाजी जाधव, बबन माने, अधिक सावकार, सचिन घाडगे, अण्णासाहेब निकम, राजू मोरे, अभिजीत घोरपडे, विकास राऊत, विकास गायकवाड, बाळासाहेब माने, सुरेश माने, अविनाश जाधव, विलास जाधव, रंजीत माने, तुषार माने, नेताजी भोसले, सोमनाथ निकम, राजू घाडगे, तुषार जाधव, विजय जाधव, सुनील मलवडकर, सुधीर जाधव आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.