मनोरंजनसातारा जिल्हाहोम

कराडमध्ये अमिताभ बच्चनप्रेमींचा २४ तासांचा आगळावेगळा संगीत सोहळा

कराड/प्रतिनिधी : – 

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये एक आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप, कराड (सातारा) यांच्या वतीने “२४ तास बच्चनगाणी” हा अनोखा कार्यक्रम रंगणार असून यात सलग २४ तास केवळ अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेली सदाबहार गाणी गायक-गायिका सादर करणार आहेत.

हा आगळावेगळा कार्यक्रम शनिवार, ११ ऑक्टोबर २०२५ रोजी कराड येथील हॉटेल पंकज एग्झिक्युटिव्ह येथे होणार आहे. विशेष म्हणजे हा संगीत सोहळा १० ऑक्टोबर मध्यरात्री १२ वाजता सुरू होऊन ११ ऑक्टोबर मध्यरात्री १२ वाजता संपन्न होईल.

या कार्यक्रमात कराड व सातारा येथील नामवंत गायक-गायिकांसह विविध संगीत संस्थांचा सहभाग राहणार आहे. कराडमधील स्वरसंस्कार म्युझिक अँड स्पीच अकॅडमी, किशोर कुमार फॅन क्लब, कॅम्पा संगीत अकॅडमी, रॉयल कराओके सिंगिंग ग्रुप, मोहम्मद रफी म्युझिक अकॅडमी, फिरोज शेख स्वरगंध परिवार, कराओके सिंगिंग क्लब, स्वरसाज सिंगिंग क्लब, रागमंजिरी ग्रुप तसेच साताऱ्याचा साज और आवाज स्वरसाधना ग्रुप या महोत्सवात सहभागी होणार आहेत.

हौशी गायक-गायिकांनाही यात संधी उपलब्ध असून त्यासाठी ६ ऑक्टोबरपर्यंत गूगल फॉर्मद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र, रात्री १२ ते सकाळी ८ या वेळेतच स्लॉट उपलब्ध असतील, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

📞 अधिक माहिती संपर्क :
डॉ. नितीन जाधव – 94220 39506
सतीश मोरे (सतिताभ) – 98811 91302
सतीश भोंगाळे – 93726 05729

हा सोहळा सर्वांसाठी खुला असून बच्चनप्रेमींसाठी तो अविस्मरणीय ठरणार आहे.

 

 

Related Articles