सातारा जिल्हाहोम

श्री मळाईदेवी पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी

मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी ५१ हजारांची मदत

कराड/प्रतिनिधी : – 
मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. शेतकऱ्यांची पिके वाहून गेली, जमिनींचे नुकसान झाले, हजारो जनावरे मृत्युमुखी पडली तसेच अनेकांचे निवासस्थान उद्ध्वस्त झाले. या आपत्तीमुळे नागरिकांची परिस्थिती अतिशय हलाखीची झाली आहे.
या सामाजिक आपत्तीची जाणीव ठेवून श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., जखिणवाडी यांनी सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. अशोकराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेकडून ५१,१११ रुपयांचा धनादेश उपनिबंधक सहकारी संस्था कराडच्या मा. सौ. अपर्णा यादव यांच्याकडे संस्थेचे चेअरमन मा. अजित थोरात काका यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला.
या वेळी संस्थेचे संचालक भीमाशंकर माऊर, सचिव सर्जेराव शिंदे, शाखाप्रमुख सौ. शर्मिला श्रीखंडे, सौ. सुजाता शिंदे, राजेंद्र येडगे, विकास लावंड तसेच मळाईदेवी शिक्षण संस्थेचे श्री. राजेंद्र पांढरपट्टे सर उपस्थित होते.
याशिवाय, सोलापूर जिल्ह्यातील बाधित भागात शिधा, नवीन कपडे, ब्लँकेट, चादरी तसेच विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्याचेही नियोजन संस्थेकडून करण्यात आले आहे.

Related Articles