मनोरंजनसातारा जिल्हा

‘पीएनबी मेटलाईफ’ची साताऱ्यात नवीन शाखा सुरू

 

सातारा /प्रतिनिधी : –

भारतातील आघाडीच्या आयुर्विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या पीएनबी मेटलाईफ इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची नवीन शाखा साताऱ्यातील पोवई नाका येथील शंकर कमल हाईट्स या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर सुरू झाली.या विस्तारामुळे कंपनीच्या महाराष्ट्रात आता एकूण १८ शाखा झाल्या आहेत.

शाखा सुरू करणे हे ‘पीएनबी मेटलाईफ’च्या “विमा सेवा सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या” कटिबद्धतेचे प्रतीक आहे. ग्राहक जिथे आहेत, तिथे त्यांच्यापर्यंत धोरण सेवा आणि विश्वासार्ह सल्ला पोहोचवण्याचा कंपनीचा उद्देश असतो.

‘पीएनबी मेटलाईफ’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी समीर बन्सल म्हणाले, “पीएनबी मेटलाईफ आणि आमचे ग्राहक यांच्यात नेहमीच विश्वासावर आधारित नाते राहिले आहे. सध्या भारतभरात आमच्या १६५ शाखा आहेत. या विस्तारातून आम्ही केवळ आमचे कार्यक्षेत्र वाढवत नाही, तर आमच्या सेवांवर ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ करीत आहोत. जिथे गरज आहे, तिथे उपस्थित राहणे, विमा संरक्षण उपलब्ध करून देणे, ते अधिक सोपे करणे आणि आर्थिक भविष्यासाठी आत्मविश्वासाने योजना आखण्यास मदत करणे, यांवर आमचा नेहमी भर असतो.”

स्वतःच्या १६५ शाखांव्यतिरिक्त, २०,०००हून अधिक बँकिंग भागीदार केंद्रांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची कंपनीची सक्षम व्यवस्था आहे. या प्रत्यक्ष नेटवर्कमधून आपल्या ग्राहकांच्या आर्थिक प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर सुसंगत, दर्जेदार सेवा आणि मदत पुरवण्यास पीएनबी मेटलाईफ कटिबद्ध आहे.

Related Articles