सातारा जिल्हाहोम

श्री गजानन महाराज संस्थानकडून पुरग्रस्तांसाठी १ कोटी ११ लाखांची मदत

कराड/प्रतिनिधी : – 
महाराष्ट्रात यंदा मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून मदतीचे आवाहन करण्यात आले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत शेगाव श्री गजानन महाराज संस्थानने सामाजिक बांधिलकी जपत भरीव मदतीचा हात पुढे केला आहे. संस्थानतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस तब्बल १ कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना २७ सप्टेंबर २०२५ रोजी सुपूर्द करण्यात आला.
श्री संस्थानकडून पुरग्रस्तांसाठी करण्यात आलेली ही मदत समाजोपयोगी कार्यासोबतच सेवाभावाची परंपरा अधोरेखित करणारी ठरली आहे.

Related Articles