श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या मल्हारपेठ शाखेचा शुभारंभ

कराड/प्रतिनिधी : –
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, जखिणवाडी या संस्थेची 21 व्या शाखेचा मल्हारपेठ, ता. पाटण येथे नुकत्याच भव्य समारंभात शुभारंभ झाला. संस्तेह्चे संस्थापक अध्यक्ष शेतीमित्र अशोकराव थोरात यांच्या हस्ते या नूतन शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
सन 1987 मध्ये गरीब शेतकरी, शेतमजूर, लघुउद्योजक व रिक्षाचालक यांच्या पतनिर्मितीसाठी स्थापन झालेली ही संस्था आज वटवृक्षाप्रमाणे 21 शाखांपर्यंत विस्तारली आहे. यापैकी 17 शाखा स्वमालकीच्या इमारतींमध्ये कार्यरत आहेत. आजघडीला संस्थेकडे 9,150 सभासद, 168.31 कोटींच्या ठेवी, 128.31 कोटींचे कर्जवाटप, 65 कोटींच्या मुदतठेवी, तर 22.47 कोटींचा राखीव निधी असून, 12.28 कोटी भागभांडवल आहे. संस्थेने स्थापनेपासून सातत्याने वर्ग संपादन करत सभासदांना दरवर्षी 10 टक्के लाभांश दिला आहे.
नव्या शाखेत NEFT, RTGS, QR कोड या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे चेअरमन अजित थोरात यांनी केले.
समारंभास अध्यक्ष अशोकराव थोरात, व्हाईस चेअरमन चंद्रकांत टंकसाळे, संचालक, सल्लागार, शाखा समिती सदस्य, मल्हारपेठ सरपंच किरण दसवंत, माजी सरपंच नारायण नलवडे, अॅड. संग्राम निकम, शरद भिसे, अशोक डिगे, दयानंद पाटील, यशवंतराव मोहिते, अभिजीत पवार, विक्रमसिंह पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शर्मिला श्रीखंडे व सौ. शोभा पाटील यांनी केले. अभिजीत पवार यांनी आभार मानले.