श्री कालिकादेवी पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा
कराड/प्रतिनिधी : –
येथील श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही सभा श्री कृष्णाबाई मंगल कार्यालय (जुने), पंतांचा कोट, सोमवार पेठ, कराड येथे होणार असून, संस्थेचे चेअरमन राजन वसंतराव वेळापुरे यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेचे कुटुंब प्रमुख मुनीर बागवान (सावकार) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक वेळापुरे यांनी दिली.
श्री. वेळापुरे म्हणाले, सभेत मागील सभेचा इतिवृत्तांत वाचन, सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रक मंजुरी, संचालक मंडळाच्या शिफारशीप्रमाणे नफा वाटप व लाभांश जाहीर करणे, लेखापरीक्षण अहवालास मान्यता, वैधानिक लेखापरिक्षकाची नेमणूक, अंदाजपत्रक मंजुरी अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.
तसेच सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी लागू केलेले सुधारीत आदर्श उपविधी दुरुस्तीसह स्वीकारण्याचा ठराव सभेत मांडला जाणार आहे. संस्थेच्या सर्व सभासदांनी या सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक वेळापुरे यांनी केले आहे.



