शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन
मान्यवरांच्या उपस्थितीत होणार शासकीय दाखल्यांचे वितरण
कराड/प्रतिनिधी : –
येथील महाराष्ट्र शासनाचे उपविभागीय कार्यालय व कराड तहसील कार्यालयाच्यावतीने शेरे (ता. कराड) येथे गुरुवार दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात लाभार्थ्यांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शासकीय दाखल्यांचे वितरण केले जाणार आहे.
सर्वसामान्य नागरिकांना शासकीय दाखले वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविले जाते. या अभियानांतर्गत आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पुढाकाराने कराड दक्षिणमधील विविध शाळांमध्ये विशेष शिबीरांचे आयोजन करुन, शासकीय दाखल्यांसाठी नोंदणी अभियान राबविण्यात आले होते. या अभियानात नोंदणी केलेल्या पात्र लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वितरण शेरे (ता. कराड) येथील शंकरआप्पा मल्टीपर्पज हॉल येथे सकाळी १० वाजता आयोजित समाधान शिबीरात केले जाणार आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, उपविभागीय कृषी अधिकारी समीर पवार, पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील, भूमी अभिलेख उपअधीक्षक प्रविण पवार, कराड पंचाय समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, तालुका शिक्षणाधिकारी बिपीन मोरे, तहसीलदार कल्पना ढवळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.



