शेतकऱ्यांनी शेतीमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करावा – आ. मनोज घोरपडे
पाडळीत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम, कृषी पूरक वाहनांचे वितरण

कराड/प्रतिनिधी : –
पारंपारिक शेतीला आता आधुनिकतेची जोड देत उत्पादन चारपट मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे प्रतिपादन आमदार मनोज घोरपडे यांनी केले.
पाडळी, ता.जि. सातारा येथे कृषि विभाग राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया २०२५-२६ अंतर्गत आयोजित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रगतशील शेतकरी महेश ढाणे यांच्या केळी बागेस भेट देण्यात आली. तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून अनुदान मिळालेल्या शेतकऱ्यांना यावेळी कृषी पूरक वाहनांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमासाठी तेजदीप ढगे तालुका कृषी अधिकारी, नितीन पवार मंडल कृषी अधिकारी, माजी पं.स.सदस्य राजेंद्र ढाणे, मार्केटिंग ऑफिसर गुलाबराव धुमाळ, नितीन जाधव, कृषी विज्ञान केंद्र बोरगावचे भुषण सर व पी.वाय. ढाणे सर, प्रा. माधवराव गुरव, सरपंच संजय ढाणे, माजी सरपंच महेश ढाणे, माजी सरपंच अशोक ढाणे, माजी सरपंच पी.बी. ढाणे, कृषी उत्पादक शेतकरी समाधान ढाणे, श्रीरंग गोरे, मांडवेच्या सरपंच गुरव मॅडम, रणजीत पाटील, उमेश नावडकर, निनामचे सरपंच सुभाष वायदंडे, अतुल ढाणे, संजय मोहिते, सागर ढाणे, दत्तात्रय ढाणे, पांडुरंग साळुंखे, उत्कृष्ट शेतकरी ऋषिनाना ढाणे, निलेश जाधव, बाळासाहेब पाटील, युवा युद्योजक मानाजी ढाणे, कृषी अधिकारी अमित घोरपडे, रोहिदास तिटकारे, संतोष चव्हाण, प्रशांत गायकवाड, रविंद्र पवार, देवराज पवार, ग्रामसेवक प्रविण ढाणे यांच्यासह सर्व शेतकरी, माता-भगिनी कार्यक्रमास उपस्थित होत्या.