सातारा जिल्हाहोम

जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड

कराड/प्रतिनिधी : –

येथील जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, तर उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड एकमताने करण्यात आली. निवडीनंतर संस्थेचे सर्व संचालक व कर्मचाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

याप्रसंगी बोलताना अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे म्हणाले, संस्थेचा एकूण व्यवसाय ९४० कोटींच्या पुढे गेला आहे. सध्या १७ शाखा कार्यरत असून, भविष्यात आणखी शाखा विस्तारासोबतच औद्योगिक क्षेत्रासाठी उपयुक्त अशा नवीन कर्ज योजना राबविण्याचा मानस आहे.

उपाध्यक्ष अभिजीत चाफेकर यांनी संचालक मंडळाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासास पात्र राहण्यासाठी मी संस्थेस अधिक वेळ देऊन काम करण्याचा प्रयत्न करेन, असा विश्वास व्यक्त केला.

या निवड प्रक्रियेस संस्थेचे सर्व संचालक मंडळ सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles