दि. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे वार्षिक पुरस्कार जाहीर
बी. जी. सुतार यांना जीवनगौरव पुरस्कार

कराड / प्रतिनिधी –
साखर उद्योग तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची संस्था दि. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया (DSTA) तर्फे वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बी. जी. सुतार यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
दि. २२ आणि २३ सप्टेंबर रोजी पुण्यातील जे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेल येथे डीएसटीएची ७० वी वार्षिक परिषद व शुगर एक्स्पो आयोजित करण्यात आली असून, यावेळी साखर उद्योग क्षेत्रातील मान्यवर व संस्थांचा सन्मान पुरस्कारांनी करण्यात येणार आहे.
जाहीर झालेले पुरस्कार
जीवनगौरव पुरस्कार – एस. डी. बोरूडे, बी. जी. सुतार, तंत्रज्ञ वा. र. आहेर
साखर उद्योग गौरव पुरस्कार – आ. विनय कोरे, बाबूराव बोत्रे पाटील, अरविंद गोरे
उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार – संजय देसाई (रिग्रीन एक्सेल), सचिन निकम (उल्का इंडस्ट्रीज), अनिलराज पिसे (राज प्रोसेसेस)
सर्वोत्तम कामगिरी पुरस्कार – कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग स.सा. कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी
पुरस्कार वितरण समारंभ सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, राष्ट्रीय साखर संस्थेच्या संचालक सीमा परोहा, साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ, विस्मा अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, एसटीएआय अध्यक्ष संजय अवस्थी व एसआयएसएसटीए अध्यक्ष एन. चिन्नप्पन यांच्या हस्ते होणार आहे.
सत्कार समारंभ
जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बी. जी. सुतार यांचा कराड तालुका साखर कामगार सभेचे अध्यक्ष एम. के. कापूरकर व शिवोस्तव गणेश मंडळ, शिवनगरचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कारखान्याचे एच. आर. मॅनेजर संदिप भोसले, वाहन विभाग प्रमुख अजित पाटील व ज्येष्ठ निवेदक रामभाऊ सातपुते उपस्थित होते.