महाराष्ट्रसातारा जिल्हा

राजेंद्रसिंह यादव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

वाढदिवसाचे सामाजिक भान; विविध उपक्रमांचा हजारोंना लाभ

कराड/प्रतिनिधी : – 

शिवसेनेचे सातारा जिल्हा समन्वयक व यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचा लाभ हजारो कराडकरांना झाला. यावेळी प्रथमच सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर देण्यात आला. राजेंद्रसिंह यादव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव दिवसभर सुरू होता.

वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम, गरजूंना मदत, गुणवंतांचा सत्कार व शिबिरे आयोजित करण्याची परंपरा राजेंद्रसिंह यादव मित्र परिवाराने यावर्षीही जपली. रविवार पेठ पाण्याची टाकी व बारा डबरे येथे नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ गरजू नागरिक व महिलांना झाला.

दत्त चौक येथे यशवंत विकास एकता मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यात शेकडो युवक, युवतींनी सहभाग घेतला. यातील विजेत्यांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सात शहीद येथे रक्तदान शिबिर व महाआरोग्य शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. रक्तदात्यांना पाच लाखांचा विमा संरक्षण देण्यात आले. संत तुकाराम हायस्कूलमध्ये संगीत साहित्य भेट देण्यात आले.

साईबाबा मंदिर, बस स्थानक परिसरात वृक्षारोपणज्ञतर शिवाजी स्टेडियम अंगणवाडीला शालेय साहित्य वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा मुजावर कॉलनी व महाराष्ट्र हायस्कूल येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. नगरपालिका शाळा क्रमांक तीनमध्ये महिला स्वसंरक्षण स्पर्धाही पार पडल्या.होणार आहेत.

खराडे कॉलनी येथे अंगणवाडी व आरोग्य सेविका सन्मान सोहळा पार पडला. तर नगरपालिका जलतरण तलाव येथे कोल्हाटी वस्तीमध्ये गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले. शाळा क्रमांक तीनमध्ये गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, आदर्श शाळा पुरस्कार सोहळा पार पडला. उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता कीट व फळेवाटप तर बसस्थानक येथे प्रवाशांना बसण्यासाठी स्टीलची बाके देण्यात आली. या सर्व उपक्रमांचा लाभ गोरगरीब व गरजू‌ नागरिक व महिलांना झाला.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार सुहास बाबर, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, संपर्क प्रमुख शरद कणसे यांच्यासह मान्यवरांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. तर आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अँड. उदयसिंह पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, कराड अर्बनचे कार्यकारी संचालक दिलीप गुरव यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. कराड व मलकापूरचे माजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक संघ व तरुण कार्यकर्ते यांनीही यादव यांना भेटून शुभेच्छा दिल्या. कराडमधील विविध समाजाच्या प्रतिनिधींनीही शुभेच्छा दिल्या.

कराड फेज टूचे कौतुक

वाढदिवसाच्या निमित्ताने राजेंद्रसिंह यादव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली कराड शहरासाठी ३२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. याचा सविस्तर आढावा यादव यांनी माध्यमांतून सादर केला. या अंतर्गत शहरात सुरू असलेल्या विकासकामांचे अनेक नागरिकांनी कौतुक करत यादव यांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles