सातारा जिल्हाहोम

सहकारमहर्षी जयवंतराव भोसले पतसंस्थेचा ‘बँकिंग फ्रंटियर्स’ पुरस्काराने गौरव

कराड/प्रतिनिधी : –
कृष्णाकाठच्या ग्रामीण भागाची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कृष्णा आर्थिक परिवाराचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे.
गोवा येथे नुकत्याच झालेल्या एका शानदार सोहळ्यात कृष्णा सहकारी बँक आणि सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्थेला ‘बँकिंग फ्रंटियर्स’ पुरस्काराने गौरविण्यात आले. कृष्णा आर्थिक परिवाराचे मार्गदर्शक विनायक भोसले यांच्यासह दोन्ही संस्थांचे संचालक व अधिकाऱ्यांनी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.
कृष्णा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा आर्थिक परिवाराचा मोठा विस्तार झाला आहे. कृष्णा आर्थिक परिवारात कृष्णा बँक, जयवंतराव भोसले पतसंस्था, कृष्णा महिला पतसंस्था व वित्तपेटा मल्टिस्टेट सोसायटी या आर्थिक संस्थांचा समावेश आहे. सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी या संस्था कार्यरत असून, ग्राहकहित आणि सभासदांचे हित जोपासण्याचा सदैव प्रयत्न कृष्णा आर्थिक परिवाराच्या माध्यमातून केला जात आहे. याच उल्लेखनीय कार्याची नोंद राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे.
‘बँकिंग फ्रंटियर्स’च्यावतीने गोवा येथे देशभरातील सहकारी बँकांची ‘राष्ट्रीय सहकारी बँकिंग शिखर परिषद’ नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष आ.डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या शानदार सोहळ्यात ‘फ्रंटियर्स इन को-ऑपरेटीव्ह बँकींग’ पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये कृष्णा सहकारी बँकेला ‘सर्वोत्कृष्ट सायबर सुरक्षा परिवर्तन’विभागासाठी आणि सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्थेला ‘सर्वोत्तम देयक व्यवस्था’ विभागासाठी ‘एफ.सी.बी.ए. २०२५’ पुरस्कार देण्यात आला. कृष्णा आर्थिक परिवाराचे मार्गदर्शक श्री. विनायक भोसले यांच्यासह दोन्ही संस्थांचे संचालक व अधिकाऱ्यांनी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.
याप्रसंगी कृष्णा बँकेचे संचालक प्रमोद पाटील, हर्षवर्धन मोहिते, विजय जगताप, गिरीश शहा, शिवाजी पाटील, अनिल बनसोडे, सरिता निकम, सारिका पवार, विजय पाटील, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सचिन तोडकर, सदस्य गुणवंत जाधव, हेमंत पाटील, दिलीपराव पाटील, सुनिल पाटील, प्रदिप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव, आय.टी. व्यवस्थापक सचिन चौधरी, मा. जयवंतराव भोसले पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाटील, व्हाईस चेअरमन धनाजी जाधव, संचालक भास्कर साळुंखे, हणमंत थोरात, शिवाजी कणसे, दादासो शेवाळे, सिद्धेश्वर पाटील, मंगेश गरुड, अमित माने, वसीम मुल्ला, बाजीराव माने, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, व्यवस्थापक अरुण यादव, विजयकुमार शेवडे, प्रवीण वाटेगावकर, धनाजी नायकल आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles