सातारा जिल्हाहोम

आमदार अतुल भोसले काले गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध – विनायक भोसले

काले येथे २५ लाख निधीच्या विकासकामाचे भूमिपूजन

कराड/प्रतिनिधी : –

ग्रामविकास हा केंद्रबिंदू मानून गावोगावी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असलेले आमदार डॉ. अतुलबाबा भोसले हे काले गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटीबद्ध आहेत, असे प्रतिपादन विनायक भोसले यांनी केले.

काले (ता. कराड) येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून काले गावातील जुना एस.टी. स्टॅण्ड ते बाजारपेठ परिसरातील रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी २५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या विकासकामाचे भूमिपूजन विनायक भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

विनायक भोसले म्हणाले, आमदार अतुलबाबा भोसले यांनी कराड दक्षिणमधील प्रत्येक गावात दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यास प्राथमिकता दिली आहे. त्यानुसार विविध गावांमध्ये विकासनिधी प्राप्त होत आहे. रस्ते, पाणी, सांडपाणी व्यवस्थापन अशा मूलभूत सोयीसुविधांसाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. येत्या काळात काले गावातील इतर विकासकामेही मार्गी लागून, गावाचा सर्वांगीण विकास साधण्यावर आमचा भर राहील. काले गावात ज्येष्ठ नेते भीमरावदादा पाटील यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या स्मारकाचा आराखडा तयार करावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

याप्रसंगी कृष्णा साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, भाजपाचे राज्य परिषद सदस्य हर्षवर्धन मोहिते, सरपंच शंकर तांदळे, उपसरपंच प्रकाश पाटील, सोसायटीचे चेअरमन दिलीप पाटील, व्हाईस चेअरमन सुनील यादव, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग बिळासकर, अरुण साठे, उत्तम देसाई, संजय देसाई, शशिकांत यादव, अशोक माळी, केशव पाटे, लालासो यादव, नाना साळुंखे, प्रल्हाद यादव यांच्यासह गावातील मान्यवर, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Related Articles