सातारा जिल्हाहोम

कराडला सुमारे ६५ हजार भाविकांनी घेतला श्रमपरिहाराचा लाभ

रणजीत पाटील नाना मित्र परिवाराचे सर्व स्तरातून कौतुक

कराड/प्रतिनिधी : – 

अनंत चतुर्थीला येथील प्रीतीसंगमावर गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांना श्रम परिहार देण्याची परंपरा सलग दहाव्या वर्षी शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक रणजीत पाटील नाना यांनी जोपासली यावर्षी झालेल्या श्रमपरिहार यामध्ये श्रम परिवाराचा सुमारे 65 हजार भाविकांनी लाभ घेतला.

रणजीत नाना पाटील मित्र परिवाराच्या वतीने यावर्षीही श्रमपरिवारासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी या उपक्रमाचा शुभारंभ झाला सकाळी घरगुती गणपती विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांनी सहकुटुंब श्रमपरिवाराचा आनंद घेतला.

सकाळी 10 वाजून दहा मिनिटांनी सुरू झालेला महाप्रसाद पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होता सुमारे 18 तास अखंड भाविकांना अन्नसेवा देण्याचे कार्य रणजीत नाना मित्रपरिवार पार पाडले सकाळी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, माजी नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, आप्पा माने, अँड. मानसिंगराव पाटील, स्मिता हुलवान, महादेव पवार, स्वाती पिसाळ, सागर आमले, अँड दीपक थोरात, अनिल खुंटाळे, छत्रपती शिवाजी स्टेडियम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा. चंद्रकांत माने व सहकारी, शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांच्यासह मान्यवरांनी भेट दिली. रणजीत पाटील नाना व सचिन पाटील यांनी स्वागत केले.

कराडकर नागरिक व मंडळांच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर या श्रमपरिहारचा लाभ घेतला. भाविकांना पाण्याची बाटलीही देण्यात येत होती.
रात्री गणेश विसर्जनासाठी आलेल्या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी श्रम परिहारा चा लाभ घेतला. रात्री बाराला वाद्ये बंद झाल्यानंतर प्रचंड गर्दी झाली होती. विसर्जन मिरवणूक रात्री अडीच वाजता पार पडल्यानंतर पहाटे चार पर्यंत महाप्रसाद सुरू होता.

श्रम परिहार पार पाडण्यासाठी नितीन महाडीक,आशपाक मुल्ला, अजित थोरात.किरण पाटील, कल्पेश मुळीक, राहुल बर्गे, महेश पाटील, दिलीप पाटील, राहुल टकले, सतीश पाटील, विजय निकम , रोहित सूतार, तेजस माने, प्रशांत बरकडे, सुहास गोतपाखर, प्रताप इंगवले, श्रीकृष्ण पाटील, सुनील शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

पोलीस कर्मचाऱ्यांना फूड पॅकेट
शहरात विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस कर्मचारी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना श्रम परिहाराचे पॅकेट पोच करण्यात आले. अनेक नागरिकांनी फूड पॅकेट सोबत नेले. सुमारे ३५ हजार पॅकेट आणि ३० हजार भाविकांनी प्रत्यक्ष श्रम परिवाराचा लाभ घेतला.

घरोघरी पोहोचली श्री उत्तरालक्ष्मीची प्रतिमा
यावर्षी रणजीत पाटील नाना यांनी श्रम परिहारच्या ठिकाणी विसर्जनाला येणाऱ्या मंडळांचे स्वागत करण्याचा उपक्रम सुरू केला. मंडळाच्या अध्यक्षांचा श्रीफळ आणि श्री उत्तरालक्ष्मी देवीची प्रतिमा देऊन सत्कार केला. या उपक्रमाचे मंडळांनी कौतुक केले.

 

Related Articles