सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
‘जयवंत शुगर्स’चा १५ वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात
32 1 minute read
कराड/प्रतिनिधी : –
धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याचा १५ वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्री. विनायक भोसले यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.
याप्रसंगी जयवंत शुगर्सचे चेअरमन चंद्रकांत देसाई, प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे, सरव्यवस्थापक एन. एम. बंडगर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कारखान्यातील कर्मचारी निलेश निकम आणि त्यांच्या पत्नी सौ. मनिषा निकम यांच्या हस्ते धार्मिक विधी करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.
यावेळी ‘जयवंत शुगर्स’चे डेप्युटी जनरल मॅनेजर (टेक्निकल) ए. बी. खटके, वर्क्स मॅनेजर एच. एम. नदाफ, प्रॉडक्शन मॅनेजर बी. जी. चव्हाणके, चिफ फायनान्स ऑफिसर बी. के. वाडेकर, सिव्हील इंजिनियर संजय जगदाळे, केन मॅनेजर नाथाजी कदम, मुख्य प्रशासकीय अधिकारी आर. टी. सिरसाट, डिस्टीलरी मॅनेजर व्ही. जी. म्हसवडे, ई.डी.पी. मॅनेजर ए. एल. काशीद, पर्चेस ऑफिसर पी. एस. जाधव, मटेरिअल मॅनेजर जी. एस. बाशिंगे, सुरक्षा अधिकारी व्ही. टी. भोसले यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
32 1 minute read



