सातारा जिल्हाहोम

कृष्णा कारखान्याची १० वर्षात उत्कृष्ट कामगिरी – डॉ. सुरेश भोसले

कारखान्याच्या ६६ व्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –

कृष्णा कारखान्याने गेल्या १० वर्षात उत्कृष्ट कामगिरी केली. सभासदांना चांगला दर देत कारखान्याचेही आधुनिकीकरण केले आहे. कृष्णा कारखाना येत्या काळात देशातील सहकारी तत्वावर चालणारा एक आदर्श साखर कारखाना म्हणून पहायला मिळेल, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले.

रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या ६६ व्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा ६६ वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. चेअरमन डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. याप्रसंगी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, विनायक भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक दयानंद पाटील,जितेंद्र पाटील,धोंडीराम जाधव, निवासराव थोरात,संजय पाटील, बाबासो शिंदे,बाजीराव निकम, शिवाजी पाटील, सयाजी यादव, दत्तात्रय देसाई, जे.डी.मोरे, विलास भंडारे, संचालिका जयश्री पाटील, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी.एन.देशपांडे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, मनोज पाटील, वैभव जाखले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

चेअरमन डॉ. सुरेश भोसले पुढे म्हणाले, कारखान्याने ऑफ सिजन मधील सर्व कामे पूर्ण केली असून या गळीत हंगामात १५ लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखाना गाळपासाठी सज्ज आहे. आपण साखरेबरोबरच विविध उपपदार्थ निर्मिती करतो. या उपपदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. येत्या काळात कारखाना विविध प्रकारच्या साखरेची निर्मिती करणार आहे. तसेच कृष्णा कारखान्याला फॉरेन लिकर तयार करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. त्याचाही कारखान्याला फायदा होणार आहे.

आमदार डॉ.अतुलबाबा भोसले म्हणाले, कृष्णा कारखान्याला लागेल ती मदत करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करत आहे. गेल्या दहा वर्षात संचालक मंडळाने उत्कृष्टपणे कामगिरी केली आहे. आर्थिक शिस्त पाळून पारदर्शक कारभार केला आहे. सभासदाला केंद्रबिंदू मानून काम केले आहे. या पुढेही करणार आहे. अशी ग्वाही आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली.

यावेळी माजी संचालक पांडुरंग होनमाने, शिवाजीराव थोरात, हर्षवर्धन मोहिते, संजय पवार, कोरेगावचे सरपंच बाळासाहेब पाटील, पै. आनंदराव मोहिते, एम के कापूरकर, बाळासाहेब पाटील, जनरल मॅनेजर टेक्निकल बालाजी पबसेटवार यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी व सभासद शेतकरी उपस्थित होते. प्रारंभी मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी स्वागत व प्रास्तविक केले. मान्यवरांचे सत्कार कराड तालुका साखर कामगार युनियनचे अध्यक्ष एम.के. कापूरकर यांनी केले. संचालक बाबासो शिंदे यांनी आभार मानले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले.

चौकट :
कर्मचाऱ्यांना दोन पगार बोनस

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना नेहमीप्रमाणे दिवाळी सणानिमित्त दोन पगार बोनस देणार असल्याची घोषणा चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केली. त्याचबरोबर चांगल्या कामगिरीसाठी इंसेंटिव्ह दिला जाणार आहे. तसेच येत्या काळात कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज अशी कॉलनी उभारण्यात येईल असे कर्मचाऱ्यांना आश्वस्त केले.

Related Articles