सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
राजारामबापू साखर कारखान्याची आज ५६ वी वार्षिक सभा
10 1 minute read

कराड/प्रतिनिधी : –
राजारामबापू साखर कारखान्याची ५६ वी वार्षिक सभा शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता कारखाना कार्यस्थळावरील प्रांगणात होत आहे. माजी मंत्री आ. जयंत पाटील हे सभेस मार्गदर्शन करणार आहेत. कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांनी या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी केले आहे.
पाटील म्हणाले, राजारामबापूंनी १९६८ साली साखराळेच्या माळावर साखर कारखान्याची उभारणी करून वाळवा तालुक्याच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली. माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने नेत्रदीपक प्रगती साधली आहे. या प्रगतीमध्ये ऊस उत्पादक सभासदांचा वाटा मोलाचा आहे. कारखान्याच्या ५६ व्या वार्षिक सभेची नोटीस, अहवाल ऊस उत्पादक सभासदांना पोहोच केलेले आहेत. सभासदांनी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे.
उपाध्यक्ष विजयराव पाटील, देवराज पाटील, कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील, प्रदीपकुमार पाटील, अतुल पाटील, अमरसिंह साळुंखे, डॉ. योजना शिंदे-पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, सचिव डी. एम. पाटील उपस्थित होते.
10 1 minute read