कृष्णा कारखान्यावर ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना
गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

कराड/प्रतिनिधी : –
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर श्री गणेशाचे आगमन मोठ्या आनंदात आणि जल्लोषात झाले. व्हाईस चेअरमन जगदीश जगताप व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. विद्या जगताप यांच्या हस्ते श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. श्री गणेशोत्सवाच्या काळात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
श्री गणरायाच्या मूर्तीची विधिवत धार्मिक पद्धतीने प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी संचालक सयाजी यादव, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, एम.के कापुरकर, बाळासाहेब पाटील, वसंतराव पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच एच आर मॅनेजर संदीप भोसले, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, शुगर गोडावून किपर किशोर देशमुख, स्टोअर किपर गोविंद मोहिते, केनयार्ड सुपरवायझर विजय मोहिते आदींसह युनियन व गणेश मंडळाचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
श्री गणेशोत्सवाच्या काळात विविध कार्यक्रमाचे आयोजन करणेत आलेले आहे. या कालावधीमध्ये शुक्रवार दि. २९ ऑगस्ट रोजी व्याख्याते प्रा.डॉ.पी.डी. पाटील यांचे ‘क्रांतिसिंह नाना पाटील- एक विचार’ या विषयावर व्याख्यान, सोमवारी दि. १ सप्टेंबर रोजी माजी पोलीस आयुक्त धनराज वंजारी यांचे ‘संतांची सामाजिक कार्ये’ या विषयावर व्याख्यान, गुरुवार दि. ४ सप्टेंबर रोजी प्रा. ज्ञानदेव काशीद यांचे ‘सह्याद्रीच्या कुशीत व्हावा शिवरायांचा जन्म नवा’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. ही सर्व व्याख्याने दुपारी ३ वाजता होणार आहेत. याचा लाभ गणेश भक्तांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.