सातारा जिल्हाहोम
आनंदराव चव्हाण विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे साकारली गणेशाची प्रतिकृती

कराड/प्रतिनिधी : –
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आनंदराव चव्हाण विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त अनोखा उपक्रम राबविण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून श्री गणेशाची आकर्षक प्रतिकृती साकारली.
या उपक्रमात तब्बल ५०१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला दिशा देण्यासाठी संस्थेचे सचिव अशोकराव थोरात यांनी मार्गदर्शन केले. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश आणि एकतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
विद्यार्थ्यांनी अनुशासन पाळत घेतलेली ही प्रतीकृती परिसरात कौतुकास पात्र ठरली आहे. शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले.