आदर्श ज्युनिअर कॉलेजमध्ये गणेशोत्सवात विद्यार्थ्यांना मोदक बनवण्याचे प्रात्यक्षिक

कराड/प्रतिनिधी : –
गणेशोत्सवानिमित्त आदर्श ज्युनिअर कॉलेज, मलकापूर येथे एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना मोदक बनवण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.
या उपक्रमात सौ. छाया माने, सौ. पूजा कांबळे, तसेच विद्यार्थिनी इरावती पाटील, श्रावणी पाटील, सपना विश्वकर्मा, श्रद्धा जाधव, वैष्णवी शिंदे, प्राची मोहिते, दीक्षा विश्वकर्मा व प्रियांका नाईकडे यांनी सहभाग घेत विविध प्रकारचे मोदक बनवून दाखवले. यामध्ये उकडीचे मोदक, ड्रायफ्रूट मोदक, मैद्याचे मोदक, चॉकलेट मोदक, बिस्कीट मोदक, खव्याचे मोदक अशा अनेक प्रकारांचा समावेश होता.
यावेळी बोलताना अशोकराव थोरात म्हणाले, पाककला ही एक उत्कृष्ट कला असून, या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. सध्या पाककलेला करिअर म्हणून मोठे महत्त्व आले आहे. मोदकांचे विविध प्रकार तयार करून बाजारात विक्रीसाठी पाठवता येतात. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान मिळते.” या अनोख्या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
कार्यशाळेस मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव अशोकराव थोरात, संचालक संजय थोरात, मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अजित थोरात, सौ. शालिनी थोरात, सर्जेराव शिंदे, प्राचार्या, विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.