सातारा जिल्हाहोम

सुनील पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

कराड/प्रतिनिधी : –

कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती आणि विजयनगर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुनील पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) जाहीर प्रवेश केला. दहिवडी (ता. माण) येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्या पक्ष प्रवेशानिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात सुनील पाटील यांचाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीनकाका पाटील, आमदार सचिन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, संजय देसाई, राजेंद्र राजपुरे, नितीन भरगुडे-पाटील, राजेश पाटील-वाठारकर, विजय यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणातून सुनील पाटील यांच्या कामाचा गौरव केला. “सुनील पाटील हे अनुभवी कार्यकर्ते असून, आगामी काळात त्यांना भक्कम पाठबळ देऊ,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

सुनील पाटील हे गेली २५ वर्षे समाजकारण व राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी तांबवे जिल्हा परिषद गटात चांगली गटबांधणी केली आहे. यावेळी त्यांच्या सोबत राजेंद्र पाटील, प्रशांत थोरात, समीर बागवान, तुषार पवार, सचिन थोरात, मोईन नदाफ, बबनराव शिंदे, ए.पी. पाटील, तुकाराम शेवाळे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

 

Related Articles