सातारा जिल्हाहोम

आटके येथे तलाठी कार्यालय व भक्तनिवासाचे भूमिपूजन

कराड/प्रतिनिधी : – 
कराड दक्षिण मतदारसंघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या कोट्यवधींच्या विकासकामांची भूमिपूजने आणि उद्‌घाटने सातत्याने होत आहेत. या पार्श्वभूमीवर आटके गावात तलाठी कार्यालय व भक्तनिवास या महत्त्वाच्या सुविधांच्या कामांचे भूमिपूजन इंद्रजीत चव्हाण यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमास सरपंच सौ. रोहिणी नितीन पाटील, उपसरपंच रमेश जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील, गजानन आवळकर, ग्रा. प. सदस्य सुरेश पाटील, बी. जी. काळे, संजय जाधव, हंबीरराव पाटील, सुनील जाधव, चंद्रकांत पाटील, संजय पाटील, अवधूत पाटील यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना इंद्रजीत चव्हाण म्हणाले, कराड दक्षिणमधील गावांनी नेहमीच पृथ्वीराज बाबांवर विश्वास ठेवला आहे. आटके हे त्यात अग्रेसर राहिले आहे. विकासाचा दृष्टिकोन जपणाऱ्या या गावाला नेहमीच प्राधान्य देण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मिळालेल्या प्रत्येक पदाचा उपयोग जनतेच्या विकासासाठी केला आहे. त्यांनी नेहमीच धोरणात्मक निर्णय घेतले, ज्याचा लाभ आजही राज्यातील व देशातील जनतेला मिळत आहे.
यावेळी अजितराव पाटील व गजानन आवळकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार बी. जी. काळे यांनी मानले.

Related Articles