सातारा जिल्हाहोम

पोलीस पाटील ग्रामप्रशासनातील अविभाज्य घटक – डॉ. वैशाली कडूकर

अमित शिंदे यांची जिल्हाध्यक्षपदी, हर्षदा शिर्के यांची महिला अध्यक्षपदी निवड

कराड / प्रतिनिधी : –

पोलीस पाटील ग्रामप्रशासनातील अविभाज्य घटक असल्याचे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी केले.

सातारा येथे महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाच्या जिल्हा कार्यकारिणी पदग्रहण सोहळ्यात त्या बोलत होत्या. संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे-पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी राज्य उपाध्यक्ष लक्ष्मण शितोळे, कार्यकारी अध्यक्ष श्रीकृष्ण साळुंखे, सरचिटणीस गुलाबराव मिंडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष साहेबराव राळे-पाटील, उपाध्यक्ष हणमंतराव सोनवलकर, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख अरुण केदारी, प्रदीप गाढवे, दत्तात्रय घाडगे-पाटील, पाटण तालुकाध्यक्ष नितीन पाटील, खंडाळा तालुकाध्यक्ष प्रशांत जाधव, शिरवळ तालुकाध्यक्ष धनंजय देशमुख, जावळी तालुकाध्यक्ष संजय कांबळे, दै. प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे, दै. पुण्यनगरीचे व्यवस्थापक संतोष कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. वैशाली कडूकर म्हणाल्या, ‘पोलीस पाटील हे पोलीस आणि जनतेमधील सुसंवादाचा दुवा आहेत. सण, उत्सव, निवडणुका, आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक पोलीस पाटील प्रशासनासोबत राहून उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत. कायदा-सुव्यवस्था राखण्यात प्रशासनाबरोबरच पोलीस पाटील यांचे मोलाचे योगदान असते.’

‘पोलीस पाटलांचे मानधन तीन हजार रुपयांपासून पंधरा हजार रुपयांपर्यंत पोहचवण्यासाठी संघाच्या माध्यमातून वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला. कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस पाटील परिवारांना पन्नास लाख रुपयांची शासकीय मदत मिळवून दिली. पोलीस पाटलांच्या न्याय हक्कासाठी गावकामगार पोलीस पाटील संघ राज्यभर लढा देत असल्याचे बाळासाहेब शिंदे-पाटील यावेळी बोलताना म्हणाले.

अमोल आढाव यांनी सूत्रसंचालन केले. नुतन कार्याध्यक्ष अनिल निकम यांनी आभार मानले.

या पदाधिकार्‍यांनी स्विकारला पदभार 

सोहळ्यात नुतन जिल्हाध्यक्ष म्हणून अमित शिंदे, उपाध्यक्ष सुभाष कदम, कार्याध्यक्ष अनिल निकम, सरचिटणीस महादेव साठे, संपर्कप्रमुख विजय सुतार, पंढरीनाथ माने, संघटक अनिल गुरव, चंद्रकांत घाडगे, विजय माने, अजय चौधरी सोमनाथ जगताप, सचिव विकास शिंदे, कार्यकारी अध्यक्ष विनोद थोरात, प्रवक्ता राहुल धायगुडे, खजिनदार रविंद्र काटकर, संघटक शंकर पवार, सल्लागार रोहिदास जमदाडे यांनी तसेच जिल्हा महिला कार्यकारणीत अध्यक्षा म्हणून हर्षदा शिर्के, कार्याध्यक्षा सोनाली पवार, सचिव वंदना चाळके, सल्लागार शितल नेरकर, प्रवक्त्या राणी डोईफोडे, उपाध्यक्षा कांताताई गोळे, वर्षा बोडरे, संघटक वैशाली काटकर, पुनम जगताप, ललिता चिकणे, मनिषा महाडिक, संचालिका धनश्री लोखंडे, शोभा जाधव, संध्याराणी माने, शितल खाडे, जयश्री भोसले, खजिनदार स्वाती जाधव, सरचिटणीस रेश्मा चव्हाण यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला.

प्रत्येक पोलीस पाटलांना मानसन्मान, योग्य हक्क आणि सुविधा आणि दर्जा मिळवून देणे ही माझी प्राथमिकता असेल. संघटना वाढीसाठी आणि पोलीस पाटलांच्या एकीसाठी प्रयत्नशिल राहणार आहे.

– अमित शिंदे, नूतन जिल्हाध्यक्ष

Related Articles