सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये होणार लहान शिशूपासून वृद्धांपर्यंत हृदयशस्त्रक्रिया

कराड/प्रतिनिधी : –
सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कराड येथे आता लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व प्रकारच्या गुंतागुंतीच्या हृदयरोग शस्त्रक्रिया जागतिक दर्जाच्या सुविधांसह करण्यात येत असल्याची माहिती हृदयशस्त्रक्रिया तज्ज्ञ नेतृत्व डॉ. अमृत नेर्लीकर यांनी दिली.
या आरोग्य सुविधेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी हृदयशस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. हर्षवर्धन सायगावकर, हॉस्पिटलचे संचालक दिलीप चव्हाण डॉ. राजेश कौशिष, डॉ. रामप्रसाद चव्हाण उपस्थित होते.
गेल्या १३ वर्षांपासून कराडमध्ये उत्तम आरोग्यसेवा पुरवणारे हे रुग्णालय गेल्या एका वर्षात हृदयशास्त्रक्रिया विभागात अत्याधुनिक तंत्रज्ञान व तज्ज्ञांची टीम उभारून ग्रामीण भागातील रुग्णांसाठी मोठा दिलासा देणारी ठरली असल्याचे सांगत या सुविधेबद्धल माहिती देताना डॉ. नेर्लीकर म्हणाले, तिन्ही धमन्या बंद असतानाही यशस्वी शस्त्रक्रियाया हॉस्पिटलमध्ये नुकतीच ४६ वर्षीय रुग्णावर ट्रिपल व्हेसल डिसीजवर यशस्वी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेत लिमा-रीमा या तंत्राचा वापर करण्यात आला, ज्यात पायातील शिरेऐवजी हृदयाच्या डाव्या आणि उजव्या इंटर्नल मेमरी आर्टेरिज वापरल्या जातात. या प्रक्रियेचे दीर्घकालीन परिणाम अधिक चांगले ठरत असल्याचे सांगितले.
डॉ. हर्षवर्धन सायगावकर यांनी, ऑन-पंप आणि ऑफ-पंप बायपास सर्जरी, मल्टी-व्हेसल ग्राफ्टिंग, कॉम्प्लेक्स अॅनास्टोमोसेस, माइट्रल-एओर्टिक व्हॉल्व्ह रिपेअर व रिप्लेसमेंट, मिनिमली इनव्हेसिव्ह CABG तसेच लहान शिशूंच्या ASD/VSD/AVSD क्लोजर व PDA लिगेशनसारख्या जन्मजात दोषांवर उपचार केले जात असल्याचे नमूद केले. तसेच कार्डियाक अॅनास्थेसिस्ट, परफ्यूजनिस्ट, अनुभवी ऑपरेशन थिएटर स्टाफ, स्वतंत्र कार्डियाक आयसीयू आणि प्रशिक्षित नर्सेस यांमुळे रुग्णांना अचूक आणि सुरक्षित सेवा मिळत असल्याचे सांगितले.
डॉ. अमित माने यांनी, ‘सह्याद्रि’त मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा फुले जनआरोग्य योजना, तसेच सर्व इन्शुरन्स योजना उपलब्ध असून, येथे इलेक्ट्रोफिजिओलॉजी स्टडी, कॅथेटर एब्लेशन, पेसमेकर लावणे अशा अत्याधुनिक सुविधा देखील असल्याचे नमूद केले.
या हॉस्पिटलमधील हृदयशास्त्रक्रिया विभागाचे नेतृत्व डॉ. अमृत नेर्लीकर, डॉ. हर्षवर्धन सायगावकर, डॉ. राजेश कौशिष, डॉ. रामप्रसाद चव्हाण आदी तज्ञ रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देत असल्याबद्धल दिलीप चव्हाण यांनी हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने त्यांचे आभार मानले.