सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
36 1 minute read

कराड/प्रतिनिधी : –
येथील दादासाहेब मोकाशी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, तसेच संलग्न घटक महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शुक्रवारी, दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. द्वितीय वर्षातील विद्यार्थिनींनी “मा तुझे सलाम” हे देशभक्तिपर समूहगीत सादर केले. कुमार सलगर, कुमारी चेतना परळकर, अनुष्का निकम व गायत्री जगताप यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मनोगत व्यक्त केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयातील द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी एकूण ३० खाद्यपदार्थांचे नेत्रदीपक प्रदर्शन आयोजित केले. यामध्ये ड्रॅगन फूड, जाम, क्रॉकर भेलबार, लेमन चटणी, जामून जाम, रागी चिवडा, कोथिंबीर लोणचे, बनाना मिल्कशेक, ब्रेड गुलाबजाम, सुगंधी दूध, ज्यूस, मोग्रा टी, लेमन मीट, व्हे ड्रिंक, नारळाचे सुगंधी दूध, डाळिंबाचा रस, मिलट आईस्क्रीम, ग्रीन मॅजिक बाईट, कॅफेन फ्री कॉफी, आरटीएस ड्रिंक आदी आकर्षक व चविष्ट पदार्थांचा समावेश होता. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांची सृजनशीलता व परिश्रम स्पष्टपणे जाणवत होते.
कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे सचिव अभिजीत मोकाशी, संचालक विलास चौधरी, लेखापाल प्रमुख दीपक कदम, तसेच घटक महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ.के.एस. घुटुकडे, डॉ.पी.पी. पाटील, प्रा.एस.ई. जगताप, प्रा.एस.एस. पवार, प्रा.डी.एस. सूर्यवंशी, प्रा.आ.एस. जाधव उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रा.एस.एन. सूर्यवंशी यांनी आभार मानले.
36 1 minute read