सातारा जिल्हाहोम

कृष्णा कारखान्यावर स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

कराड/प्रतिनिधी : –
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कारखान्याचे व्हा.चेअरमन जगदीश जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी संचालक बाजीराव निकम, अविनाश खरात, विलास भंडारे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक फरांदे , एम. के. कापूरकर, बाळासाहेब पाटील यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी आदींची उपस्थिती होती. यावेळी कारखाना संरक्षण विभागातर्फे शानदार ध्वजसंचलन करण्यात आले.

दरम्यान जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयात इस्लामपुर नगरपालिकेचे माजी नगरसेवक शहाजी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याठिकाणी प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

Related Articles