प्रेमलाकाकी चव्हाण विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

कराड/प्रतिनिधी : –
विजयनगर, ता. कराड येथे प्रेमलाकाकी चव्हाण माध्यमिक विद्यालयात भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सैदापूरचे माजी सरपंच मोहनराव जाधव, विजयनगरच्या सरपंच अनिता संकपाळ, उपसरपंच मानसिंग पाटील, दिलीपराव पाटील, विश्वासराव पाटील, युवा नेते प्रतापसिंह पाटील, माजी सरपंच संजय शिलवंत, विजयराव कदम, कमांडो शैलेश शिंदे, हिम्मत देसाई, शंभूराज पाटील आदी मान्यवरांसह ग्रामपंचायत सदस्य, पालक, माजी विद्यार्थी व तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
विद्यार्थिनी सई भिसे, अमिना शहा व यासिन शेख यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. विविध स्पर्धा परीक्षा व क्रीडास्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आमदार आनंदराव पाटील यांनी विद्यालयाची स्थापना, शैक्षणिक सुविधा व वाढती गुणवत्ता यांचा उल्लेख करून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसोबत परिसराचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन केले. तर मोहनराव जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत मोबाईलचा वापर कमी करण्याचे आव्हान पालकांना केले.
यावेळी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मोबाईलच्या दुष्परिणामांवर आधारित विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथनाट्य विशेष आकर्षण ठरले. कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यापक चव्हाण यांनी, गुरुकुलचे शंभूराज पाटील यांनी आभार मानले.