हेळगाव सोसायटीच्या विजयी उमदेवारांचा आमदार मनोज घोरपडे यांच्याकडून सत्कार

कराड/प्रतिनिधी : –
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील हेळगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी निवडणुकीत जनशक्ती सहकार पॅनलला दणदणीत विजय संपादन केल्याबद्दल सर्व विजयी उमेदवारांचे आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हेळगाव विकास सेवा सोसायटीमध्ये आ. मनोज घोरपडे यांना मानणाऱ्या जनशक्ती पॅनेलने मोठा विजय संपादित केला असून सर्व विजयी उमेदवारांनी सातारा येथील कार्यालयात आ. मनोज घोरपडे यांची भेट घेतली. यावेळी सर्व विजय उमेदवारांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना आमदार मनोज घोरपडे म्हणाले, केंद्रात, राज्यात सत्ता महायुतीची आहे. या ठिकाणी आमदारही महायुतीचे आहेत. त्यामुळे गावातील ग्रामपंचायत आणि विकास सेवा सोसायटी येणाऱ्या दिवसांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका ही जर महायुतीच्या विचाराच्या झाल्या, तर विकास कामांना गती देता येईल.
यावेळी संग्राम घोरपडे, रामचंद्र सुर्यवंशी, किसन पाटील, संदिप संकपाळ, संचालक प्राथमिक शिक्षक बँक, प्रदिप बानुगडे, वैभव इंगळे, धनाजी चव्हाण, सतिश माने, संभाजी वाघमारे, जालिंदर माने, दादासो शिंदे, उपसरपंच गोसावेवाडी, संजय पवार, शामराव बानुगडे, श्रीकांत पाटील, सुनिल बानुगडे, मच्छिंद्र बानुगडे,विकास सुर्यवंशी, श्रीकांत पाटील,शिवम सुर्यवंशी यांच्या सर्व विजय उमेदवार व हेळगाव, कचरेवाडी, गोसावेवाडी, बानूगडेवाडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.