सातारा जिल्हाहोम

कराड एसटी आगाराची राज्यस्तरीय परिक्षण समितीकडून पाहणी

कराड/प्रतिनिधी : –

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत येथील बसस्थानकाची राज्यस्तरीय समितीने पाहणी केली. या समितीने बसस्थानकात केलेल्या स्वच्छतेच्या उपाययोजना, शौचालये, पाण्याची व्यवस्था, बागबगिचा यासह अन्य सोयी-सुविधांची पाहणी करुन समाधान व्यक्त केले.

प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसस्थानकात चांगल्या सोयी-सुविधा निर्माण व्हाव्या, प्रवाशांना चांगल्या सोयी उपलब्ध कराव्या या हेतुने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबवण्यात येत आहे.

त्याअंतर्गत मुंबई विभागाच्या प्रादेशिक व्यवस्थापिका यामिनी जोशी, मुंबई विभागाचे वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी शेगोकर यांच्या समितीने मंगळवारी पाहणी केली. यावेळी वरिष्ठ आगार व्यवस्थापिका शर्मिष्ठा पोळ, आगार व्यवस्थापक विक्रम हंडे, आगार लेखाकार प्रकाश भांदिर्गे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक अनिल लटके, वाहतूक नियंत्रक अनिल सावंत, वरिष्ठ लिपीक सचिन महाडीक, सुरज पाटील, दिपक महाजन, अमित कोळी, जगन्नाथ शिंदे, माधुरी फणसे, शुभांगी जामदार, सुरेखा साळुंखे, रेश्मा पवार यांच्यासह आगारातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

Related Articles