सातारा जिल्हाहोम

शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा

कराड/प्रतिनिधी : –

शेतकरी, शेतमजूर आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी झगडणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराड येथे उत्साहात साजरा करण्यात आला. २ ऑगस्ट १९४७ रोजी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे या पक्षाची स्थापना करण्यात आली होती. या ऐतिहासिक पक्षाच्या कार्यपद्धतीचा गौरव करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष भाई अ‍ॅड. समीर देसाई यांनी पक्षाच्या कार्याचा आढावा घेतला.

भाई समीर देसाई म्हणाले, “शेतकरी कामगार पक्षाची स्थापना समाजातील शोषित, वंचित, शेतकरी आणि शेतमजुरांच्या न्याय हक्कासाठी करण्यात आली होती. आज ७८ वर्षांनंतरही पक्षाची तत्वे, विचारधारा आणि धोरणे तशीच ठाम असून, कधीही कोणत्याही सत्तेसोबत तडजोड केली नाही.”

पक्षासाठी आपले संपूर्ण आयुष्य झोकून देणाऱ्या नेत्यांचा गौरव करत, “भाई गणपतराव देशमुख, भाई एन.डी. पाटील, भाई केशवराव पवार, अ‍ॅड. भाऊसाहेब देसाई यांसारख्या नेत्यांनी पक्ष संघटनेसाठी आयुष्य वेचले. त्यांच्यामुळेच पक्ष आजही आपल्या विचारांवर ठाम असल्याचे मत तयी यक्त केले.

या कार्यक्रमास भाई एम.आर. जाधव, भाई दिनकरराव गुरव, अ‍ॅड. हैबतराव पवार, भाई युवराज मस्के, संपतराव जाधव, संभाजी जाधव, अ‍ॅड. अमित लाड आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपली भूमिका अधिक प्रभावीपणे बजावण्याचा संकल्प केला. यावेळी उपस्थितांनी एकमताने पुन्हा एकदा समाजातील वंचित घटकांसाठी लढण्याची भूमिका बजावण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related Articles