सातारा जिल्हाहोम

भाजपाच्या महारक्तदान संकल्प अभियानाला उदंड प्रतिसाद

मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कराड येथे उत्साहात संपन्न 

कराड/प्रतिनिधी : – 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कराड येथे भव्य महारक्तदान संकल्प अभियान राबवण्यात आले. या शिबीराला रक्तदात्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.
ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रभर ‘महारक्तदान अभियान’ राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील ३३ मंडलांमध्ये महारक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. कराड येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात कराड शहर, कराड दक्षिण मध्य, कराड दक्षिण पूर्व आणि कराड दक्षिण पश्चिम अशा चार मंडलांचे रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले.
भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर व माजी आमदार आनंदराव पाटील यांच्या हस्ते या शिबीराचे उद्‌घाटन करण्यात आले. शिबीरात अनेकांनी रक्तदान करत आपला सहभाग नोंदविला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तूचे वितरण करण्यात आले.
या अभियानासाठी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय, कराड येथील कृष्णा हॉस्पिटल, सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, यशवंतराव चव्हाण ब्लड बँक आणि महालक्ष्मी ब्लड बँक या संस्थांचे सहकार्य लाभले. यावेळी भाजपाचे राज्य परिषद सदस्य संजय पवार, हर्षवर्धन मोहिते, राज्य कार्यकारिणी सदस्य सौ. स्वाती पिसाळ, कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, पैलवान धनंजय पाटील, कराड शहराध्यक्ष सौ. सुषमा लोखंडे, मंडल अध्यक्ष राजेंद्र यादव, प्रविण साळुंखे, माजी नगरसेवक सुहास जगताप, महादेव पवार, मलकापूरचे माजी नगरसेवक दिनेश रैनाक, सुनील शिंदे, शंकर पाटील, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सुरज शेवाळे, राजू मुल्ला, भारत जंत्रे, संतोष हिंगसे, धनाजी माने, सुदर्शन पाटसकर, गिरीश शहा, वसीम मुल्ला, रमेश मोहिते, रमेश लवटे, प्रमोद पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles