सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
‘कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे
'व्ही.एस.आय'च्या ऊस शेती ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण शिबीरासाठी २३ महिला रवाना
14 1 minute read

कराड/प्रतिनिधी : –
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने ऊस शेती ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. चार दिवसीय शिबीरासाठी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या २३ महिला सभासद शेतकरी रवाना झाल्या असून, त्यांना अत्याधुनिक ऊसशेतीचे धडे गिरविण्याची संधी मिळणार आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटतर्फे शेतकर्यांना दरवर्षी ऊसशेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, ऊसाच्या प्रतिएकरी उत्पादनवाढीसाठी प्रशिक्षण दिले जाते. कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने कार्यक्षेत्रातील २३ महिला सभासद शेतकर्यांना या शिबीरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. शिबीरासाठी रवाना होणाऱ्या महिला शेतकऱ्यांना मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
शिबीरात माती परीक्षण, अधिक ऊस उत्पादनासाठी खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, खोडवा व्यवस्थापन, ऊती संवर्धित रोपे, बियाणे मळा, रोग व कीड नियंत्रण व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जैविक खतांचा वापर आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी जनरल मॅनेजर (केन) दादासाहेब शेळके, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, एच.आर. मॅनेजर संदीप भोसले, परचेस मॅनेजर विक्रमसिंह माने, बाळासाहेब पाटील यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
14 1 minute read