सातारा जिल्हाहोम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान

सातारा जिल्ह्यात ३३ ठिकाणी आयोजन; ५००० रक्तपिशव्यांच्या संकलनाचे उद्दिष्ट

कराड/प्रतिनिधी : – 
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्यावतीने मंगळवार दि. २२ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर ‘महारक्तदान अभियान’ राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील ३३ मंडलांमध्ये महारक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातून एकूण ५००० रक्तपिशव्यांचे संकलन करण्याचा निर्धार आल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्यावतीने राज्यभर सेवा अभियानअंतर्गत महारक्तदान शिबीर आयोजित करण्याचा निर्धार प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. याअंतर्गत सातारा जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये एकूण ३३ मंडल क्षेत्रांच्या ठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.
दरम्यान, कराड दक्षिण मतदारसंघातही मंगळवारी (ता. २२) मार्केट यार्ड, कराड येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या हस्ते या शिबीराचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे. या अभियानासाठी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय, कराड येथील कृष्णा हॉस्पिटल, सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, यशवंतराव चव्हाण ब्लड बँक आणि महालक्ष्मी ब्लड बँक या संस्थांचे सहकार्य लाभणार आहे.
या रक्तदान मोहिमेत नागरिक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन, रक्तदान करण्याचे आवाहन आ.डॉ. भोसले यांनी केले आहे.

Related Articles