सातारा जिल्हाहोम

नियमित व्यायामाने शारिरीक व मानसिक आरोग्य सुदृढ होते – डॉ. एस. बी. खरबडे 

कराड/प्रतिनिधी  : – 
नियमित व्यायाम केल्याने शारिरीक क्षमता वाढते, नैराश्य कमी होवून उत्साह वाढतो व रोगप्रतिकारक शक्ती सूधारते. ओपन जिम उपकरणाच्या साहयाने केलेल्या नियमित व्यायामाने निसर्गाच्या सानिध्यात शरीर लवचिक वनते एकत्र येवून व्यायाम केल्याने सांधिक भावना व बौध्दीक क्षमता वाढते, त्यामूळे मूलींनी नियमितपणे ओपन जिम उपकरणांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व नियमितपणे व्यायाम करून आपले शारिरीक व मानसिक आरोग्य सुदृढ करावे, असे प्रतिपादन अधिष्ठाता (कृषि) व संचालक शिक्षण, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे डॉ. एस. बी. खरबडे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण कृषि महाविद्यालय, कराड येथे विद्यार्थीनी वसतिगृहाच्या प्रांगणात ओपन जिम उपकरणच्या उदघाटन प्रसंगी विद्यार्थीनींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी डॉ. एस.बी. खरबडे यांच्या हस्ते विद्यार्थीनी वसतिगृहाच्या प्रांगणात ओपन जिम उपकरणाचे उदघाटन व विद्यार्थी वसतिगृह परिसरामध्ये सुपारी या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. या भेटीवेळी यशवंतराव चव्हाण शासकीय कृषि महाविद्यालय, कराडच्या डॉ. इंदिरा घोनमोडे, सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य यांच्या समवेत कृषि महाविद्यालय, कराड व कृषि संशोधन केंद्र कराड येथील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles