सातारा जिल्हाहोम

मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये शास्त्रीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण

कराड/प्रतिनिधी : –

श्रीमती लक्ष्मीबाई रामचंद्र मोकाशी चॅरिटेबल ट्रस्ट व राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन (मॅनेज) हैदराबाद यांच्या ‘नॅशनल बी बोर्ड’च्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. 7 रोजी सात दिवसीय आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने मधुमक्षिका पालन प्रशिक्षणाची सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन (मॅनेज) हैदराबादचे डॉ. सुरिखा दास, डेपोटी डायरेक्टर मॅनेज हैदराबादचे डॉ. शहाजी फंड, प्रमुख पाहुणे संस्थापक कृषी कन्या उ‌द्योग समूहाच्या श्रीमती रोहिणी पाटील, प्रशिक्षण डायरेक्टर विलास चौधरी, केंद्रप्रमुख डॉ.के.एस. घुटुकडे, प्रशिक्षण समन्वयक डॉ.एस.एम. घाडगे उपस्थित होते.

प्रशिक्षणाची सुरुवात फोटो पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली या त्यानंतर आयोजित कार्यक्रमाचे प्रशिक्षण भारत सरकार कृषी मंत्रालय व नॅशनल बी बोर्ड निर्देशित माहिती, अनुभव व भेटी या रुपरेषे प्रमाणे पार पडले. देशभरात हा कार्यक्रम आधुनिक मधुमक्षिका पालन तंत्रज्ञान माहिती व प्रसार यासाठी आयोजित केला जात असून, यामाध्यमातून स्वयंरोजगार निर्माण होतील. प्रशिक्षणा‌द्वारे मधुमक्षिका पालन व त्याची शास्त्रीय माहिती याबाबत जागृती निर्माण करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी श्रीमती लक्ष्मीबाई रामचंद्र मोकाशी प्रतिष्ठानचे सचिव अभिजीत मोकाशी, उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी यांच्या प्रोत्साहनाने शैक्षणिक संकुलामध्ये एकूण 25 प्रशिक्षणार्थीने प्रशिक्षण घेतले.

Related Articles